Home » जळगाव » रस्त्यावर पडून असलेल्या वाळूमुळे वाहतुकीस अडथळा ; अपघात घडल्यास जबाबदार कोण ?

रस्त्यावर पडून असलेल्या वाळूमुळे वाहतुकीस अडथळा ; अपघात घडल्यास जबाबदार कोण ?

कजगाव ( वास्तव पोस्ट ) : भडगाव तालुक्यातून जाणाऱ्या एरंडोल-येवला महामार्गाचे काम काही दिवसापूर्वी करण्यात आले. या महामार्गावर भडगाव ते कोळगाव दरम्यान रस्त्यावर वाळू पडली असल्याने अपघाताची भीती निर्माण होत आहे.

एरंडोल ते येवला महामार्गावर भडगाव कोळगाव दरम्यान वाक, वडजी, पिचडे फाटा, शिवनी या गावालगत ट्रॅक्टर व इतर वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून वाळू ही रस्त्यावर सांडली जाते. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना अपघात होतात, या रस्त्यालगत असलेल्या नदीपात्रातून वाळू वाहतूक या मार्गाने होत असते.

यादरम्यान वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून वाळू गळती होऊन ही वाळू रस्त्यावर पडते. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना ती अडथळा ठरत आहे. या वाळूमध्ये काही वाहनधारक घसरून पडल्याने जखमी झाले आहे. हा महामार्ग ठीक ठिकाणी वळणदार असल्याने त्यावर पडलेल्या वाळूमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. महसूल व बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देत याची बदाेबस्तसाठी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी हाेत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!