Home » जळगाव » जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सहकार, राजकीय क्षेत्राची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे. राज्यातील जनता ही आपले प्रश्न अडीअडचणी, तक्रारी (समस्या) घेऊन त्यांच्या दरबारी जात होते व जनतेची कामे मार्गी लावेपर्यंत त्या समस्येचा पाठपुरावा उपमुख्यमंत्री अजित पवार करीत असत. त्यांच्या या आपल्यातून अकाली निघून जाण्याने राज्यातील जनता पोरकी झाली असल्याचं मत जनसेवा विचारधारा फाऊंडेशन अध्यक्ष- निलेश बोरा यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केले.

दादांची दैनदिन कामाची वेळ ही पहाटे ५ वाजेपासून सुरू व्हायची व दिवसाचे १६-१७ तास काम करून नागरीकांच्या प्रश्नांचा निपटारा जागेवरच करीत असल्याचा त्यांचा राज्यभरात नाव लौकिक होता. व त्यांची प्रशासनावर असलेली पकड ही वाखाणण्या जोगी होती. आजच्या राजकीय परिस्थितीत शब्दाला जागणारा एकमेव नेता म्हणून त्यांची ओळख राज्याला होती. अशा या लाडक्या नेत्याचे कार्य हे सामान्य जनतेच्या मनात कायम कोरलेले राहील अशा शब्दात निलेश बोरा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी शेखर देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त करत अजित पवार हे आज आपल्यातून निघुन गेले यावर विश्वास बसत नसल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी- उपस्थितांचे मन गहिवरून आले. सदर श्रद्धांजली कार्यक्रम दि.२८ रोजी रात्री-९:०० वाजता चौघुले प्लॉट हनुमान मंदिर चौक, जळगांव येथे जनसेवा विचारधारा फाऊंडेशन तर्फे घेण्यात आला.

सर्वप्रथम- अजित पवार यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते- हिरालाल वाणी, डॉ.राजेंद्र बडगुजर यांच्या हस्ते माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते-कैलास तिवारी, मधुकर चौधरी, राजेश सपकाळे, विजय सोनवणे, राजू मिस्तरी, सचिन ठाकूर, पप्पू पाटील, दिलीप सावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या- शारदा बोरा, योगिता चौधरी, रेखा गवळी, उमेश भालेराव, बापू कोळी, शेखर देशमुख, महेश भालेराव, सागर सोनार, मानव चौधरी, नथ्थू बोरसे, संदिप पाटील, नाना महाजन, राजेश गवळी, सचिन चौधरी, सतिष चौधरी, कवि-प्रकाश पाटील, प्रल्हाद चौधरी, मुरलीधर सपकाळे, संजय वाणी, लक्ष्मण पाटील, रविंद्र पी. चौधरी, महेश गायकवाड, नरेंद चौधरी, घनश्याम गवळी, विठ्ठल सावळे, कृष्णा गवळी, राजू कुमावत, रविंद्र मराठे, अमोल चौधरी आदींनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!