Headlines
Home » राष्ट्रीय » निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा ७६३ पानांचा डेटा !

निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा ७६३ पानांचा डेटा !

नवी दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या इलेक्टोरल बॉन्ड्स बाबतची माहीती निवडूक आयोगाने मुदातीच्या आतच आपल्या वेबसाइट वर प्रसिद्ध केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला १५ मार्च २०२४ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत डेटा वेबसाइटवर अपलोड करण्यासाठी मुदत दिली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर, स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) १२ मार्च रोजी आयोगासोबत डेटा शेअर केला होता.

१५ फेब्रुवारी रोजी दिलेल्या ऐतिहासिक निकालात, सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने अनामित राजकीय निधीला परवानगी देणारी केंद्राची निवडणूक बाँड योजना रद्द केली होती. खंडपीठाने हे घटनाबाह्य ठरवत निवडणूक आयोगाला देणगीदार, त्यांनी दिलेली रक्कम आणि प्राप्तकर्त्यांची माहिती जाहीर करण्याचे आदेश दिले होते.

आदेशानुसार राष्ट्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाइटवर इलेक्टोरल बाँड्सचा डेटा दोन भागांमध्ये अपलोड केला आहे, आयोगाने इलेक्टोरल बाँड्सचा डेटा आपल्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. हा डेटा ७६३ पानांचा आहे.

https://www.eci.gov.in/disclosure-of-electoral-bonds?fbclid=IwAR04M__PChIowcn6RPdV2CCYBek2QXT_nCxRbQI87NTprFdxFIpup1C4mKY

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्या पानावर १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ पर्यंतच्या पक्षांचा डेटा आहे. पहिला डेटा ४२६ पृष्ठांचा आहे. प्रत्येक पक्षाला किती देणगी मिळाली आहे ते या यादीत दिसून येते. दुसरा डेटा ३३७ पृष्ठांचा आहे. त्यात १२ एप्रिल २०१९ ते ११ जानेवारी २०२४ पर्यंतचा डेटा आहे. यामध्ये कंपन्या आणि इतर लोकांच्या वतीने SBI कडून बाँड खरेदी करण्याबाबत माहिती आहे.

या प्रमुख कंपन्यांनी देणगी दिली
इलेक्टोरल बॉण्ड्सद्वारे राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांमध्ये फिनोलेक्स केबल्स लिमिटेड, लक्ष्मी निवास मित्तल, एडलवाईस हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, जीएचसीएल लिमिटेड, जिंदाल पॉली फिल्म्स लिमिटेड, आयटीसी लिमिटेड, वेदांत लि. या व्यतिरिक्त स्पाइसजेट लिमिटेड, जेके सिमेंट लिमिटेड, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स लिमिटेड, एव्हॉन सायकल्स लिमिटेड, जेके सिमेंट लिमिटेड, झायडस हेल्थकेअर लिमिटेड, सिप्ला लिमिटेड, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड, मॅनकाइंड फार्मा लिमिटेड यांनीही देणगी दिली आहे. ग्रासिम इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामल एंटरप्रायझेस यांनीही देणगी दिली आहे.

One thought on “निवडणूक आयोगाने आपल्या वेबसाईटवर अपलोड केला इलेक्टोरल बाँड्सचा ७६३ पानांचा डेटा !

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!