भाग–३
जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीत असलेले तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालया अंतर्गत तथा उपविभाग विभागाचे कार्यालयाचे अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे मुख्य निवासस्थान बंगले भगीरथ तारांगत असे विविध प्रकारचे बंगले व निवासस्थाने आहेत या निवासस्थानात अधिकाऱ्यांचा वावर आठवड्यातुन पाच दिवस असतो तर आठवड्यातल्या सायंकाळच्या शुक्रवारी शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी गावाकडे अधिकारी गावाकडे निघून जातात व अधिकाऱ्यांचे बंगले सह निवासस्थान ओस पडतात. या ठिकाणी सर्व जबाबदारी सुरक्षा रक्षकाची नेमणूक दिलेली असते. मात्र प्रामाणिक काम करणारे सुरक्षारक्षकच नसल्याने शासनाची साधन संपत्ती रक्षण करण्याऐवजी सुरक्षा रक्षक च एक गेट केबिन बूम मध्ये दिसत नसतात. म्हणजेच एखादा अज्ञात व्यक्तीने अनधिकृत पण या बंगल्यात निवासस्थानावर प्रवेश करून चोऱ्या माऱ्याकरण्याचा डाव फासल्यास याची जबाबदारी कोणाची असेल ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडतो.
हमें नही किसी का डर, लघु पाटबंधारे विभाग और उपसा सिंचन विभाग मे बैठा है हमारा आका फिर काय को हमारे सुरक्षा रक्षक किसको डरेगा…।
अशा हिंदी भाषेच्या परिभाषा तळीरामाच्या अड्ड्यावर सुरक्षारक्षकांची भाषाशैली बोलताना दिसतात. या बाबत सुरक्षारक्षकांवर नियोजित बोलण्याचे धडे देऊन शिस्त लावणे अपेक्षित आहे.
■ सुरक्षा रक्षकांच्या आशिर्वादाने तळीरामांचा अड्डा
ज्या ठिकाणी शासकीय निवासस्थानावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येते त्या ठिकाणी सुरक्षारक्षक ड्युटीवर अर्धा तास थांबून ड्युटी सोडून कामाच्या वेळेत सतत फोनवर बोलत असतात. तसेच फोनवर क्रिकेट गेम देखील खेळत असतात. त्यात कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे चालू नसल्याने भिंतीच्या आड तळीरामांचा अड्डा दहा ते बारा वाजेपर्यंत सुरू करून काही सुरक्षा रक्षक त्या मद्यपींना मदत करतात, त्यांच्यात सामील होऊन मद्यधुंद अवस्थेत असतात. याबाबत सुरक्षारक्षकांवर नियंत्रण नसल्याने सुरक्षारक्षकांचा बेशिस्तपणा फावताना दिसतं आहे. तरी या बाबत सुरक्षारक्षकांवर नियंत्रण कोण ठेवणार ? असा प्रश्न उपस्थित होतो.

तापी पाटबंधारे विकास महामंडळातील मुख्य अभियंता डिनर सोबत घेतात का ? अशी दबक्या आवाजात चर्चा असल्यामुळे मुख्य अभियंत्याचा आशीर्वाद सुरक्षारक्षकांना असल्याने शासकीय हायटेक कार्यालय व विविध बंगले व निवासस्थानावर लागलेली सुरक्षा वाऱ्यावर झाल्याची दिसत असून शासकीय बंगल्यांचे धिंडवडे निघायला सुरुवात झाली आहे. विशेष मुख्य अभियंता यांना सर्व सुरक्षारक्षकांची नियोजित नियोजनाची माहिती असून सुद्धा ड्युटी संबंधित कानाडोळा का केला जातो, तसेच काही सुरक्षा रक्षक ड्युटीला हजर नसतात तरी त्यांची हजेरी लावली जाते. याबाबत मुख्यअभियंता यांचा आशीर्वाद काही सुरक्षारक्षकांना लाभलेला आहे, असे सुरक्षारक्षक कार्यालयीन काही अधिकारी यांच्याकडून बोलले जात आहे.

■ बायोमेट्रिक हजेरीचा अभाव : सुरक्षा रक्षकाचा वजनाचा भाव
तापी पाटबंधारे विकास महामंडळ या अखत्यारितील हायटेक शासकीय कार्यालय हे आजारी पडल्यासारखी दिसून येत आहे अलिशान खुर्ची टेबल गेट वरील बूम केबिन सुरक्षारक्षकांना रुबाबाचा तो ड्रेस कोड एका गेट वर दोन-दोन सुरक्षारक्षक इतका रुबाबांचा वारा असून सुद्धा अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने व पाठबळामुळेच हायटेक शासकीय कार्यालयात हजेरी पत्रक व बायोमेट्रिक लागत नसेल तर कुठेतरी घोळात घोळ घालणारा घोटाळा होत असल्याचा संशय निर्माण होतो. याबाबत स्थानिक अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन कार्यालयात शिस्त व कामकाजात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे शासकीय साधनसंपत्तीचं जतन केले जाईल व या बाबत चांगले कामाचे मनोबल वाढले.
■ जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे मंत्री यांनी लक्ष देण्याची गरज
तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या कार्यक्षेत्राचा प्रवाह मोठा असुन या कार्यालयांकडे जिल्हाधिकारी व जलसंपदा मंत्री यांनी आढावा बैठक घेऊन अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना वेळोवेळी कामांचा अहवाल मागावावा. सदर जिल्हाधिकारी व जलसंपदा मंत्री कार्यालयाची पाहणी करतील का ? तसेच दोषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची झाडा झडती घेवुन कारवाईची भुमिका घेतील का ? का कारवाईचे कागद गुलदस्त्याच्या फाईलमध्ये शो पीस म्हणून कार्यालयाच्या अभिलेखावर ठेवतात, हे पाहणे सुज्ञ नागरिकांना गरजेचे ठरेल.
(क्रमशः)
