Home » सांस्कृतिक » १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावजले जाईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

१०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावजले जाईल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अमळनेर दि.५ ( प्रतिनिधी ) – ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात मुख्यमंत्री दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले. साहित्य संमेलन ही आपली थोर परंपरा असून सांस्कृतिक विचारांची ही गंगा अखंड वाहते आहे. शंभराव्या साहित्य संमेलनाकडे वाटचाल करीत असून १०० वे साहित्य संमेलन हे जागतिक स्तरावर नावाजले जाईल एवढ्या भव्य प्रमाणावर त्याचे आयोजन करण्यात येईल, त्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी यावेळी दिली. अमळनेर येथे शंभर वर्ष जूने तत्वज्ञान केंद्र असून त्याच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव शासनाकडे आल्यास त्याचा सकारात्मक विचार केला जाईल. अशी ग्वाही देतानाच मराठी लोकसाहित्याच्या संशोधन व ग्रंथ लेखनासाठी विशेष अनुदान देणार असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

थोर साहित्यिकांच्या, संतांनी लिहिलेल्या दुर्मिळ हस्तलिखितांच्या जतनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून साहित्य संस्कृती भवन उभे करण्याची संकल्पना शासनाची आहे. या साहित्य, संस्कृती भवनाद्वारे जिल्ह्यातील साहित्य, कलेच्या प्रचार- प्रसाराला एक हक्काचे व्यासपीठ मिळेल. प्रकाशन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ग्रंथयात्रा अर्थात ग्रंथ प्रदर्शन भरविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!