जळगाव ( वास्तव पोस्ट ) : अरुणामाई काॅलेज ऑफ फार्मसी मुमुराबाद तसेच बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापिठ जळगाव फार्मसी काॅलेज चा विद्यार्थी तेजस ज्ञानेश्वर कुमावत याने दि.२४ नोव्हेंबर रोजी शिरपुर येथे झालेल्या विभागीय बाॅक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळविल्याने त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या बद्दल सर्व स्तरावरुन त्याचे कौतुक केले जात आहे. तसेच त्याला पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
तेजसच्या या यशासाठी अरुणामाई फार्मसी काॅलेजचे प्रिंन्सिपल तुषार देशमुख, त्याच्या क्रीडा शिक्षक माधुरी नारखेडे तसेच वडील ज्ञानेश्वर कुमावत मुख्याध्यापक पी.एम. मुंदडे हायस्कूल आणि आई भारती कुमावत काउंसेलर तसेच भाऊ रीतीक कुमावत, काॅलेज मधील शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी तसेच सर्व मित्र परीवार नातेवाईक यांचे अनमोल असे सहकार्य लाभले.
