Home » महाराष्ट्र » नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध

नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध

मुंबई | दि. ४ (वास्तव पोस्ट न्यूज ) – अमरावतीच्या विद्यमान खासदार आणि लोकसभा २०२४ च्या भाजप उमेदवार नवनीत कौर राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई हायकोर्टाने नवनीत राणांच्या जातीचा दाखला बनावट ठरवला होता. मुंबई हायकोर्टाचा हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे नवनीत राणा यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राणा यांनी महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. नवनीत राणा म्हणाल्या, गेल्या १२ वर्षापासून मी संघर्ष करत होते, त्या संघर्षाला मला न्याय मिळाला. दरम्यानच्या काळात विरोधकांकडून माझ्या बदनामीचा प्रयत्न झाला, चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न झाला पण आज सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून आज दूध का दूध पानी का पानी झालं असे सांगताना त्यांनी निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.

काय होते प्रकरण?
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचा अनुसूचित जातीचा दाखला बनावट आहे आणि तो गैर पद्धतीने मिळवण्यात आला आहे, असे मुंबई हायकोर्टाने ८ जून २०२१ रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले होते. इतकेच नव्हे तर बेकायदा कृत्य केल्याबद्दल हायकोर्टाने त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!