चोपडा ( वास्तव पोस्ट ) : सध्या बालक, मुली व महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी येथील शेतकरी कृती समितीच्यावतीने Good Touch व Bad Touch याविषयी पालक महिला, शिक्षक व शिक्षिका यांना मास्टर ट्रेनर म्हणून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. अगदी सुरवातीलाच जर अशा प्रवृत्तींना ओळखून त्याची माहिती शिक्षक व पालकांनी पोलिसांना कळवली तर खूप मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. त्यासाठी आपण सहकार्य करावे असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिक्षक अण्णासाहेब घोलप यांनी यावेळी केले.
रोटरीचे पुढील प्रांतपाल व बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेश पाटील यांनी आताच्या मोबाईलच्या युगात मुलांप्रती पालक व शिक्षकांनी सजग राहण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले.
पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी महिलांना सिक्स सेन्स असतो त्यामुळे ती कोणाची नजर किंवा टच कसा ते ओळखू शकते त्यात दरारा निर्माण केला तर कुणाचीही हिम्मत होणार नाही. तेच आपल्या मुलींना देखील शिकवा असे सांगितले.
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी पोलिसांच्या मदत घेण्यासाठी हेल्पलाइन नंबर चा वापर करावा म्हणजे दहा मिनिटात तेथे आपणास मदत मिळेल असा शब्द दिला.
ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ.कांचन नारखेडे यांनी “टच” ह्या शब्दाऐवजी “safe touch” ह्या शब्दाचा प्रयोग जास्त महत्वाचा असून आई, वडील, आजी आजोबा यांचे स्पर्शाचा आनंद देखील हिरावता कामा नये हे सांगताना ‘जे अवयव स्विमिंग सूट मध्ये बंद असतात अशा अवयवांना दुसऱ्याने केलेला स्पर्श हा Bad’ व उर्वरित अवयवांना केलेला स्पर्श हा Good touch होऊ शकतो’. तसेच सध्या मुली मुल दोघांना एकत्र मार्गदर्शन करावे असे सांगितले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व काउंसलर समुपदेशक भारती कुमावत यांनी जिल्हा विधीसेवा प्राधिकरण याची मनोधैर्य समिती व त्यातील हाताळलेल्या बाबी सविस्तरपणे सांगितल्या. अत्याचाराच्या केसेस मध्ये मुलींची ओळख लपवून ठेवली जाते, परंतु त्यांनी न घाबरता पुढे येण्याची गरज असल्याचे सांगितले.
मानसोपचार तज्ञ डॉ. उमा चांदूरकर यांनी आपले प्रेझेंटेशन मध्ये Good Touch व Bad Touch बाबत चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितले.

डॉ. प्राजक्ता भामरे व डॉ.नीता जैस्वाल यांनी मुले व मुली वयात येताना त्यांच्यात होणारे शारिरिक बदलांबाबत त्यांच्या सोबत पालकांनी काय चर्चा करावी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच चोपडा डॉक्टर्स असोसिएशन प्रत्येक शाळेत याविषयावर पालकांसाठी माहितीशिबिर घेणार असल्याचे सांगितलं.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.बी. पाटील यांनी शेतकरी कृती समितीचे सदस्य यांनी वाईट प्रवृत्ती ह्या प्रत्येक काळात होत्या. त्या त्या काळात अश्या राक्षसांचा फडशा महिलांनी दुर्गा आणि काली मातेचा अवतार घेवून केला. त्यासाठी प्रशिक्षणासाठी खास शिक्षक व शिक्षिका यांच्या पासून सुरुवात केल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दिपक पाटील यांनी केले. प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलीला संकटात कसे सामोरे जायचे याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. आभार शिक्षण विस्तार अधिकारी अविनाश पाटील यांनी मानले.
या कार्यक्रमासाठी पंचायत समिती बीडीओ रमेश वाघ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर, सहा सरकारी अभियोक्ता ॲड भाग्यश्री अहिरराव पाटील, विजया पाटील, संध्या महाजन, डॉ प्रकाश सपकाळे, पत्रकार चंद्रकांत पाटील, सुनील पाटील, मिलिंद सोनवणे, यशवंत जडे यांचेसह मोठ्या प्रमाणावर शिक्षक शिक्षिका हजर होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शेतकरी कृती समितीचे डॉ.रवींद्र निकम, भागवत महाजन, मेहमूद बागवान, प्रफुल्ल राजपूत, प्रशांत पाटील, चंद्रकांत पाटील, अजित पाटील, संजीव बाविस्कर, ॲड कुलदीप पाटील, कुलदीप पाटील, धीरज महाजन, पंकज कोळी, प्रा.प्रदीप पाटील, पोलीस विभाग, पंचायत समितीचे सहकारी, नगरपरिषद कर्मचारी, शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन चे प्राचार्य व त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.
