जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव तालुकास्तरीय शासकीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन अनुभूती निवासी स्कूल येथे करण्यात आले होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभागांतर्गत होणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन जैन स्पोर्ट्स अकॅडमी आणि अनुभूती निवासी स्कूल ने केले होते. मुलं आणि मुलींसाठी असलेल्या या स्पर्धेत १४, १७ आणि १९ वयोगटातील खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन जळगाव तालुक्याचे प्रमुख क्रीडा अधिकारी प्रशांत कोल्हे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी जेन्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीचे रवींद्र धर्माधिकारी, काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षिक अजय काशीद, रुस्तमजी स्कूलचे क्रीडा शिक्षिक नरेंद्र तळेकर, विवेकानंद प्रतिष्ठान सेमीच्या क्रीडा शिक्षिका रामेश्वरी वाणी, शानभागचे संजय यादव, इकराचे अमीर खान, एल.एच.पाटीलचे क्रीडा शिक्षक किशोर भोई आदी उपस्थित होते.
◆ शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धा अंतिम निकाल :
- १४ वर्षे मुले
- ब.गो.शानभाग विजेता
- रुस्तमजी इंटरनॅशनल उपविजेता
- १४ वर्षे मुली
- रुस्तमजी इंटरनॅशनल विजेता
विवेकानंद प्रतिष्ठान सेमी उपविजेता - १७ वर्षे मुले
- अनुभूती निवासी स्कूल विजेता
- ब.गो.शानभाग उपविजेता
- १७ वर्षे मुली
- रुस्तमजी इंटरनॅशनल विजेता
- ब.गो.शानभाग उपविजेता
विजयी झालेल्या संघांचे अनुभूती निवासी स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका निशा जैन, प्राचार्य देबाशिष दास, व्यवस्थापक विक्रांत जाधव यांनी
कौतुक व अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचलीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे फुटबॉल प्रशिक्षक अब्दुल मोहसीन यांच्या नेतृत्व खाली सुरज सपके,धनंजय धनगर, वसीम शेख, दीपक सस्ते आयान शेख, दिनेश पावरा, तुषार गुजर, शुभम पाटील, विकास बारी आकाश कांबळे परिश्रम घेतले.
