Headlines
Home » जळगाव » विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्यासाठी कौशल्यांची गरज : कौशल्य विकास कार्यक्रमात डॉ. भूकन यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्यासाठी कौशल्यांची गरज : कौशल्य विकास कार्यक्रमात डॉ. भूकन यांचे प्रतिपादन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : केसीई सोसायटीच्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, PMUSHA या उपक्रम अंतर्गत कौशल्य विकसन कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उदघाटन डॉ साहेबराव भूकन, अधिष्ठाता, आंतरविद्या शाखा, यांच्या हस्ते झाले. उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे हे होते.

विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख होण्यासाठी कौशल्यांची गरज आणि या उपक्रमात विद्यापीठाचे योगदान यावर डॉ. भूकन यांनी विचार व्यक्त केले. पहिल्या सत्रात महेंद्र नेमाडे यांनी अध्यापन कौशल्ये, गणितीय कोडे, ऑनलाईन संगणक प्रशिक्षण या विषयावर रोजगार च्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात योगेश पाटील यांनी सायबर हल्ले आणि त्यापासून बचाव करण्यासाठी ची जागृती, तसेच इतर सायबर कौशल्य यावर विस्तृत माहिती दिली. तिसऱ्या सत्रात ऑनलाईन रोजगार शोध आणि अर्ज तयार करणे यासारख्या विषयावर प्रात्याक्षिक, विविध ऑनलाईन संकेतस्थळ यांचा वापर करण्यात आला.

कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रात डॉ. योगेश महाले यांनी त्यांच्या विशिष्ट शैलीत विद्यार्थ्यांना सूत्रसंचालन करताना घ्यावयाची काळजी आणि सूत्रसंचालन क्षेत्रातील रोजगार संधी या उदाहरणसह विद्यार्थ्यांसमोर मांडल्या. तात्विक आणि वास्तविक अशा दोन्ही अंगांनी कार्यशाळेत तज्ञांनी त्यांचे विचार मांडले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा.केतन चौधरी, प्रा. गणेश पाटील, प्रा. पूनम जमधडे आणि प्रा. संभाजी जमधडे यांनी केले.

या कार्यशाळेत जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी यांचा सहभाग होता. विद्यार्थी हितासाठी आणि रोजगाराभिमुख दिशा प्राप्तीसाठी ही कार्यशाळा महत्वाची ठरेल असे मत विद्यार्थी मनोगतातून व्यक्त झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!