Headlines
Home » जळगाव » किलबिल बालक मंदिर शाळेत विद्यार्थी प्रवेश सोहळा संपन्न

किलबिल बालक मंदिर शाळेत विद्यार्थी प्रवेश सोहळा संपन्न

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित किलबिल बालक मंदिर शाळेमध्ये सोमवार रोजी शाळेचा पहिला दिवस असल्या कारणाने स्वागतासाठी शिक्षकांनी छान सजावट केली. त्यावेळी प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना नेमाडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. तसेच भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

स्वागतम स्वागतम स्वागतम…
घरात अंकुरणाऱ्या विजांना देऊया प्रकाश नवा, आशीर्वादासह आत्मविश्वास ही हवा…
स्वागत करतो मुलांनो तुमचे,
शाळेचा पहिला दिवस हा नवा.

यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आणि शिक्षकांनी हसतमुखाने विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश दिला यावेळेस विद्यार्थ्यांना रमविण्यासाठी फुग्यांनी सजावट करण्यात आली होती. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!