Headlines
Home » जळगाव » एस.एस.बी.टी. इंजिनिअरींग काॕलेज बांभोरी येथे कायदे विषयक मार्गदर्शन

एस.एस.बी.टी. इंजिनिअरींग काॕलेज बांभोरी येथे कायदे विषयक मार्गदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हा विधीसेवा प्राधिकरण तर्फे रॅगिंग विरोधी कायदे, मोटर वाहन कायदा, मनोधैर्य समिती आर्थिक सहाय्य तसेच पोक्सो बाल लैंगिक अत्याचारा पासुन बालकांचे संरक्षण या विविध विषयांवर विद्यार्थ्यांना एस एस बीटी ईंजनिअरींग काॕलेज बांभोरी येथे मार्गदर्शन करण्यात आले.

दिवाणी न्यायाधिश वरीष्ठ स्तर एस.पी.सय्यद यांनी पोक्सो कायदा, गुन्हा कसा घडतो व त्याची शिक्षा या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच अॕड. केतन सोनार यांनी मोटर वाहन कायद्या विषयी मार्गदर्शन केले, तर अॕड. येवले यांनी रॕगिंग विषयी कायदे आणि शिक्षा या विषयावर मार्गदर्शन केले.

यावेळी भारती कुमावत काउंसलर यांनी पिडीत मुलींना मनोधैर्य समिती मार्फत कसे अर्थिक व शैक्षणिक साहय्य मिळते या विषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी एस.एस.बी.टी. काॅलेचे डाॕ.जी.के. पटनाईक, प्राचार्य डाॕ.हुसेन, चेअरमन यशवंत चित्ते रजिस्टार आदी उपस्थीत होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!