Home » जळगाव » एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वर्धापन दिन सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात वर्धापन दिन सप्ताहानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : एस.एस. मणियार विधी महाविद्यालयात खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी वर्धापन दिन सप्ताह निमित्ताने विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.एन. राजुरकर लाभले. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.युवा कुमार रेड्डी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.एस.पी .सय्यद, के.सी.ई .सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले, के.सी.ई .सोसायटीचे उपाध्यक्ष ॲड. प्रकाश बी.पाटील, कार्यक्रम समन्वयक विजेता सिंग हे होते.

कार्यक्रमास वरिष्ठ प्रा. डॉ.डी.आर. क्षीरसागर, डॉ.रेखा पाहूजा, प्रा.गणपत धुमाळ ,प्रा. योगेश महाजन, डॉ. अंजली बोंदार, प्रा.शरद चव्हाण, प्रा. ज्योती भोळे, प्रा.बी.एस. पाटील, प्रा. नितीन मटकरी, प्रा.स्वाती लोखंडे, प्रा.ललिता सपकाळे, प्रा. अनिता वराडे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ या समोरील अडचणी आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ यांचे तुलनात्मक विश्लेषण केले. नवीन कायदे आणि सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय यामधील सहसंबंध विद्यार्थ्यांना वास्तविक उदाहरणातून सांगितले. तसेच कायदा संरक्षणासाठी वकिलांची आणि न्यायाधीशांची भूमिका न्या.राजूरकर यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.

तत्पूर्वी प्राचार्य डॉ.रेड्डी यांनी प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले. ॲड. जंगले यांनीही मार्गदर्शन केले तर ॲड. प्रकाश पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईशा पिंपळीकर ने केले तर डॉ. विजेता सिंग यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!