Home » राष्ट्रीय » सपाकडून जया बच्चन राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज

सपाकडून जया बच्चन राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज

नवी दिल्ली, दि.१३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -आतापर्यंत राज्यसभेत आपल्याला अनेक अभिनेत्री व अभिनेते सदस्य म्हणून पाहायला मिळाले आहेत, परंतु त्या सगळ्यांच्या तुलनेत जया बच्चन यांची कारकीर्द विशेष गाजली .जया बच्चन ह्या राज्यसभेच्या पाचव्या कार्यकाळासाठी सज्ज झाल्या आहेत, समाजवादी पक्षाने त्यांना उत्तर प्रदेशमधून वरिष्ठ सभागृहासाठी उमेदवार म्हणून घोषित केले.

विधान संशोधन संस्था PRS च्या मते, ७५ वर्षीय बच्चन यांची २००९ ते २०२४ दरम्यान वरिष्ठ सभागृहात ८२ टक्के उपस्थिती होती, जी राष्ट्रीय सरासरी ७९ टक्क्यांपेक्षा तीन टक्के जास्त आहे. २०२३ च्या पावसाळी अधिवेशनापासून ते नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत बच्चन यांनी राज्यसभेची एकही बैठक चुकवली नाही. सप्टेंबर २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर झालेल्या वादादरम्यान बच्चन यांनी चित्रपट उद्योगाला बदनाम करण्याच्या कथित षडयंत्रावर चर्चा करण्यासाठी सभागृहात शून्य तासाची नोटीस दिली होती .

जया बच्चन यांच्यासह सपाने २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधून रामजी लाल सुमन आणि आलोक रंजन यांचीही नावे पाठवली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!