Headlines
Home » महाराष्ट्र » सिन्नर बनणार विकसित नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिन्नर बनणार विकसित नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिन्नर ( वास्तव पोस्ट ) : आज दि. १ डिसेंबर रोजी सिन्नर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार हेमंत वाजे व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेस मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहून त्यांनी उपस्थित जनसमुदायाला संबोधन केले.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले सिन्नरवासियांना आम्ही सांगू इच्छितो की, पहिल्यांदाच आम्ही तुमच्यासमोर या निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरलो आहोत. सिन्नरमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना, भुयारी गटारांची योजना, तसेच शिवसृष्टीची निर्मिती अशा विविध योजनांसाठी आपल्या सरकाराकडे निधी उपलब्ध आहे, त्यामुळे या सर्व योजना मंजूर होतील हा विश्वास आहे.

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’, सुरत-चेन्नई महामार्ग अशा विविध बाबींमुळे सिन्नर हे महत्त्वाचे शहर बनत आहे. तसेच दोन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सिन्नर हे कुंभमेळ्याचे प्रवेशद्वार बनणार आहे. उद्या होणाऱ्या निवडणुकीत सिन्नरवासियांनी आमच्या उमेदवारांना निवडून द्यावे. पुढची ५ वर्ष आम्ही सिन्नरच्या जनतेच्या विकासाची काळजी घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

यावेळी मंत्री गिरीष महाजन, आमदार ॲड. राहुल ढिकले व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!