Home » जळगाव » के.सी.ई सोसायटीच्या च्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

के.सी.ई सोसायटीच्या च्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : खान्देश एजुकेशन सोसायटी च्या शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून मु.जे.स्वायत्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे,कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य.डाॅ.अशोक राणे, उपप्राचार्य डॉ.केतन चौधरी व सर्व प्राध्यापक वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रा.स.ना.भारंबे शिवाजी महाराजांच्या काळातील स्त्री सन्मान व शिवाजी महाराजांची युद्धनीती यावर आपले मनोगत व्यक्त केले. आधुनिक काळात देखील शिवाजी महाराजांचे विचार किती उपयुक्त आहे यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांनी शिवविचार स्वत:मध्ये निरंतर जागृत ठेवण्याचे आवाहन केले.

विद्यार्थी चंद्रसिंग वडवी, राजेंद्र पटले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राध्यापक संभाजी जमधडे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गणेश पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.पुनम जमधडे विद्यार्थी निर्मलकुमार वडवी, प्रियंका पाटील यांचे सहकार्य लाभले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!