पाचोरा | दि.१८ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पाचोरा येथील वरखेडी रोड येथे असलेले इस्कॉन येथील जगन्नाथ पुरी महाराजांचे बांधलेले भव्य मंदिर या ठिकाणी श्री जगन्नाथ पुरी महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त अनेक कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी श्री जगन्नाथ पुरी महाराजांच्या वर्धापन दिनानिमित्त परमपूज्य श्री लोकनाथ स्वामी महाराजांचे भव्य प्रवचन आयोजित केले होते.

या कार्यक्रमासाठी पाचोरा शहरातील व आजूबाजूच्या खेड्यावरील भक्तगणांनी प्रवचनाचा लाभ घेतला. तसेच हरे रामा हरे कृष्ण या देवभक्त गीतावर महिला, पुरुष भक्त मंडळींनी आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेनेच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी व नरेंद्र सूर्यवंशी, रमेश मोरे, नितीन तावडे, भरत खंडेलवाल यांनी महाराजांचे दर्शन व प्रवचनाचा लाभ घेतला. वैशालीताई सूर्यवंशी आणि नरेंद्र सिंग सूर्यवंशी यांनी जवळजवळ तीन तास थांबून कार्यक्रमाचा पूर्ण आनंद घेतला. यावेळी प्रवचनास आलेल्या सुमारे दहा ते पंधरा हजार भक्तांनी दक्ष महाप्रसादाचा लाभ घेतला.
