Home » राष्ट्रीय » सीनिअर सिटिझन कार्ड २०२५ : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी १ डिसेंबरपासून लागू

सीनिअर सिटिझन कार्ड २०२५ : केंद्र सरकारकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी १ डिसेंबरपासून लागू

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट ) : ‘सीनिअर सिटिझन कार्ड २०२५’ या नवीन उपक्रमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. देशातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी केंद्र सरकारने आज हा मोठा निर्णय घेतला. या कार्डद्वारे ६० वर्षांवरील नागरिकांना आठ प्रकारच्या महत्त्वपूर्ण सुविधा ह्या एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत.

सदर कार्डसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून मिळणार असून विविध सरकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी या कार्डचा वापर करता येईल.

■ योजनेचे ठळक मुद्दे :

१. आरोग्य सुविधांचा विस्तार :
आयुष्मान भारत अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना ५ लाखां रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागात मोबाइल हेल्थ युनिट्स व टेलीमेडिसिन सेवा सुरू कारण्यात येईल तसेच डॉक्टरांचा सल्ला मिळवण्यासाठी शहरात जाण्याची गरज नाही.

२. प्रवासात मोठ्या सवलती :
जेष्ठ नारिकांसाठी रेल्वे तिकिटांवर ३०% ते ५०% पर्यंत सूट मिळणार असून राज्य व खासगी बसेस, तसेच विमान प्रवासातही विशेष दर आणि धार्मिक यात्रांसाठी अतिरिक्त मदत मिळणार आहे.

३. आर्थिक सुरक्षेला मजबूत आधार :
मासिक पेन्शन ५,००० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असून scssसह विविध बचत योजनांवरील व्याजदर वाढवण्याची तयारी आहे.

४. बँकिंग सेवांमध्ये प्राधान्य :
सर्व बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विशेष काउंटर अनिवार्य करण्यात आले असून बँक कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण यासाठी देण्यात येणार आहे.

५. आवश्यक सेवांमध्ये प्राधान्य :
हॉस्पिटल, बँक, सरकारी कार्यालये, रेल्वे स्टेशन यांसारख्या ठिकाणी कार्डधारकांना प्राधान्य सेवा उपलब्ध होणार आहेत.

६. कायदेशीर मदत मोफत :
या योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात कायदेशीर मदत कक्ष स्थापन करण्यात येऊन मालमत्ता वाद, पेन्शन समस्या, आर्थिक फसवणूक यांसारख्या प्रकरणांमध्ये मोफत सल्ला जेष्ठ नागरिकांना दिला जाणार आहे.

७. विशेष सुरक्षा व्यवस्था :
वृद्धांवरील हिंसा, शोषण किंवा कुटुंबाकडून दुर्लक्ष रोखण्यासाठी विशेष सुरक्षा केंद्रांची स्थापना तसेच पोलिसांकडून त्वरित कारवाई आणि सतत देखरेख होणार आहे.

८. योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीला गती :
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्त सहभागाने सर्व राज्यांना कार्ड वितरण, सुविधा उभारणी आणि सेवा सुधारणा याची जबाबदारी देऊन तसे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

दरम्यान केंद्र सरकारची ही योजना देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक ऐतिहासिक पाऊल असून आरोग्य सेवा, प्रवास सवलत, आर्थिक सुरक्षा, बँकिंग प्राधान्य, सामाजिक संरक्षण आणि कायदेशीर मदत अशा सर्वंकष सुविधा उपलब्ध करून ज्येष्ठांचे जीवन सुखमय बनवले जाणार आहे. सीनिअर सिटिझन कार्ड २०२५ हे केवळ ओळखपत्र नसून सन्मानाचे आणि सुरक्षिततेचे प्रतीक बनणार आहे असे तज्ञांचे मत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!