Headlines
Home » जळगाव » तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत हायटेक कार्यालयांची सुरक्षा – असुरक्षित ; मुख्यअभियंता काय भूमिका घेणार

तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत हायटेक कार्यालयांची सुरक्षा – असुरक्षित ; मुख्यअभियंता काय भूमिका घेणार

भाग : २
जळगाव (वास्तव पोस्ट) : शहरातील आकाशवाणी सर्कलच्या हाकेवर तापी पाटबंधारे विकास महामंडळ कार्यालय असून या अंतर्गत लघु पाटबंधारे व उपसा सिंचन विभाग कार्यालय आहेत तसेच शासकीय अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे निवासस्थानी बंगले भगीरथ तारंगत असे विविध प्रकारचे बंगल्यांसह हायटेक शासकीय कार्यालय असून या ठिकाणी महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक रोजगार नियमन आणि कल्याण अंतर्गत नियुक्ती केलेले सुरक्षा रक्षक नसल्याबाबत दिसून आले आहे.

विशेष सविस्तर वृत्त असे की तापी पाटबंधारे विकास महामंडळ या कार्यालयासह आधिनस्तिन काही उपकार्यालय आहेत या कार्यालयात व कार्यालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले असून सीसीटिव्हि कॅमेर असून बंद अवस्थेत धुडक्यात पडल्यासारखे दिसून येत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यास सुरक्षारक्षकांच्या हालचाली त्यात दिसतात तसेच वॉचमन केबिन व बुम बॅरिटर आवश्यक आहे व कार्यालयाच्या आवारात सुरक्षा रक्षकांनी कार्यालयाची सुरक्षा करणे गरजेचे आहे शासकीय कार्यालय म्हणजे सार्वजनिक साधनसंपत्तीची मालमत्ताच असे म्हटले जाते.

■ हायटेक कार्यालयाच्या गेटवर सुरक्षा रक्षक दिसतात कुठे

सुरक्षारक्षकांची तापी पाटबंधारे विकास महामंडळ लघु पाटबंधारे व उपसा सिंचन या कार्यालयांच्या गेटवर सुरक्षारक्षक असून काही सुरक्षारक्षक सकाळी ड्युटीवर हजर पासुन त्यांचा दैनंदिन दिवस कामाच्या वेळेत सुरक्षाकरणे सोडुन करून दुर्लक्ष करण्याचे प्रकार घडतात ते असे मोबाईल फोनचा सतत वापर करतात वेळी अवेळी चहा नाश्ता व खाण्यापिण्याच्या निमित्ताने जागा सोडून निघून जाणे मित्रांबरोबर व जवळपास सुरक्षा रक्षकान बरोबर जागेवर जागा सोडून गप्पा मारणे असे ही प्रकार आढळून येतात. मग आपली सुरक्षा रक्षकाची जागा सोडून जातात कुठं मग सुरक्षा रक्षक दिसतात कुठे असा प्रश्न निर्माण होतो.

■ मुख्य अभियंता हायटेक कार्यालयांच्या सुरक्षा बाबत कानाडोळा का करतात?

अकार्यक्षम सुरक्षा व्यवस्थेमुळे अनधिकृत व्यक्ती रात्री बेरात्री कार्यालयांच्या आवारात फिरताना दिसतात कार्यालयात च्या आवाराच्या सीसीटीव्ही कॅमेरे चालू असल्यास सुरक्षारक्षकांच्या हालचाली त्यात दिसतात म्हणजे वरील पारदर्शकता पद्धतीचा काटेकोरपणे वापर होतो व सुरक्षेवर होणारा खर्च वसूल होतो व खर्च करारासाठी कार्यपद्धत अवलंबल्यामुळे सर्व बाबतीत शिस्तबद्ध व पारदर्शकता कारभाराची सवय लागते. मात्र असे न करता संबंधित या सुरक्षारक्षकांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने त्यांना बेशिस्तपणाचे धडे फावतोय. याबाबत मुख्य अभियंता यांनी सुरक्षा रक्षकांबाबत आढावा बैठक घेणे गरजेचे असून व ड्युटीच्या कामकाजाबाबत जाणून घेणे गरजेचे आहे म्हणजे शासकीय हायटेक कार्यालय असुरक्षित ऐवजी सुरक्षित असतील एवढेच मात्र खरे ठरेल.
भाग : २

पुढील भागात शासकीय हायटेक कार्यालयाचे धिंडवडे काढले सुरक्षारक्षकांनी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!