Headlines
Home » जळगाव » ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरिय विज्ञान प्रदर्शन

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात शालेयस्तरिय विज्ञान प्रदर्शन

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात आज दि.१२ डिसेंबर २०२४ रोजी शालेस्तरिय विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले. त्यात एकूण १५० मॉडेल्स सादर करण्यात आले. प्रदर्शनात इ.५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

प्रदर्शनात चालू समस्यांवर आधारित तसेच पाणी, पर्यावरण, प्रदूषण, डिजिटल इंडिया, आधुनिक शेती, आधुनिक तंत्रज्ञान चा वापर यावर आधारित सुंदर असे मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केले.

प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे यांनी केले. प्रदर्शनाचे परिक्षणाचे पर्यवेक्षक नरेंद्र पालवे आणि जेष्ठ शिक्षक महेन्द्र नेमाडे यांनी केले.

५ वी ते ७ वी गटात
प्रथम क्रमांक नताशा स्वप्नील पवार ६वी ब
द्वितीय क्रमांक दर्शन दिनेश सोनावणे ७अ
तृतीय क्रमांक सुधांशू विजय मिस्तरी ७ब
उत्तेजनार्थ
१.कार्तिक संजय भोसले. २.वैदेही वेदप्रकाश गडादे

८वी ते १० गट
प्रथम चिन्मय जितेंद्र पाटील ९ ब
द्वितीय भावेश संदीप मनोरे ९ ब
तृतीय सार्थक तुषार पाटील ८ब
उत्तेजनार्थ आयुष सचिन वाघ ८ ड.

प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान मंडळ व पूनम कोल्हे व सर्व विज्ञान शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!