Home » शैक्षणिक » अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना

यवतमाळ ( वास्तव पोस्ट ) : सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात राज्यातील अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांकरीता परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि.६ सप्टेंबर असून अर्ज आयुक्त, समाज कल्याणआयुक्तालय महाराष्ट्र राज्य, ३, चर्चपथ, पुणे-१ यांच्याकडे सादर करावयाचे आहेत.

तरी अल्पसंख्याक समुदयातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक इरफान ईमलनस प्रदेश अध्यक्ष मानव अधिकार आयोग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!