जळगाव ( वास्तव पोस्ट ) : दि.२५ ऑगस्ट रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी या महिला सक्षमीकरण अंतर्गत मेळावा सभा घेण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील महिलांना योग्य प्रकारे आणि त्यांच्या मोबाईल मध्ये माहिती मिळावी याकरिता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांच्या मार्गदर्शनात १५०० बसेस मध्ये रेडिओ मनभावन सामुदायिक रेडिओ केंद्र करणार जवळपास एक लाख महिलांना मार्गदर्शन, यामध्ये आपत्ती व्यवस्थापन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सूचना रेडिओच्या माध्यमातून थेट महिलांपर्यंत पोहोचणार आहेत. घरून निघाल्यापासून घरापर्यंत पोहोचण्यापर्यंत सर्व महिलांना रेडिओ मनभावांच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, रेडिओ मनभावाने एप्लीकेशन डेव्हलप केले आहे याद्वारे महिलांना एका क्लिकवर रेडिओच्या व्हाट्सअप वर मेसेज पाठवता येणार आहे. आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग लगेच त्या संदेशाची दखल घेणार आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत संचालित व्हावी म्हणून प्रशासन विविध माध्यमांचा वापर करत आहे, त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा कार्यक्रम रेडिओवरून प्रसारित होत असतो. त्याच अनुषंगाने आता रेडिओ ट्राफिक संदर्भातील माहिती, रेडिओवरून प्रसारित करणार आल्याचे संचालक अमोल देशमुख यांनी सांगितलेले आहे. खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदूदादा बेंडाळे यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं जळगाव जिल्ह्यातलं पहिलं सामुदायिक रेडिओ विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचं प्रसारण करत असत.
