Home » महाराष्ट्र » सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : अखेर वाल्मीक कराड पुणे सीआइडी ला शरण !

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : अखेर वाल्मीक कराड पुणे सीआइडी ला शरण !

पुणे ( वास्तव पोस्ट ) : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारण्यांकडे जनतेचे लक्ष लागून होते. कारण या हत्याकांडातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड याचे जवळपास सर्वच प्रमुख राजकीय नेत्यांसोबत उठबस असल्याचे फ़ोटो आणि विडिओ प्रसार माध्यमात व्हायरल झाले होते. अखेर आज मंगळवार दि.३१ रोजी पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करली.

दरम्यान वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वीचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या प्रकारामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले. कराडवर विरोधकांनी टीकास्त्र सोडत त्याला मंत्री मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप केला होता. संतोष देशमुख हत्या प्रकरण तापल्यानंतर कराड अचानक गायब झाला होता. सीआयडीने त्याचा कसून शोध घेतला आणि अखेर तो सीआयडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाला.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर चार आरोपींना अटक करण्यात आली होती, तर तीन आरोपी फरार होते. बिड येथे विपक्ष तसेच सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी मोर्चा देखिल काढला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. गेल्या चार दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते.

सीआयडीच्या तपासात वाल्मिक कराडचे नाव सतत पुढे येत होते. हत्येनंतर कराड बेपत्ता होता, त्याचा कोणालाही ठावठिकाणा माहीत नव्हता. त्यामुळे कराडवर मास्टरमाईंड असल्याचा आरोप होऊ लागला. सीआयडीने कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी करून तपासाचा फास आवळला आणि कराडला शरण येण्यास भाग पाडले. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर आता पुढील तपासातून अनेक रहस्य उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र कराडच्या विडिओ मध्ये त्याने राजकीय द्वेषापोटी त्याचे नाव या प्रकारणा सोबत जोडले गेल्याचे म्हटले असून दोषी व्हावी अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!