जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : सामाजिक बांधकाम विभाग रवी भवन नागपूर येथे माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती व पोलिस मित्र फाउंडेशन वार्षिक राज्य समन्वय बैठक आयोजित करण्यात आली व राज्य कार्यकारिणी चे सहर्ष स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर व महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड , राज्य कार्याध्यक्ष सखाराम पंत कुलकर्णी तसेच राज्य संपर्क प्रमुख विकास गोरवडकर यांच्या एका मतांनी ठराव घेवून त्यांच्या कामाची दखल घेऊन जिल्हा अध्यक्षहुन फेर निवड उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटक पदी पदोन्नती करण्यात आली व आयडी कार्ड व नियुक्ती पत्र संस्थापक अध्यक्ष महेश सारणीकर यांच्या हस्ते वाटप करुन सत्कार करण्यात आले.
या बैठकीत महाराष्ट्र राज्य मधून सर्व जिल्हा तसेच विभागीय पदाधिकारी यांनी पुढील वाट चालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या व उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभाग रवी भवन नागपूर येथे दि.१९ रोजी बैठक पार पाडली. प्रारंभी उपस्थित नुतन सभासद समितीचा महत्वाचा विविध विषयांवर माहिती देण्यात आली नवनिर्वाचित सर्व सदस्यांचे समितीतर्फे निवडीबद्दल त्याचे माहीती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सखाराम कुलकर्णी महाराष्ट्र राज्य सचिव विनोद गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण बाधन, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
