जळगाव ( प्रतिनिधि ) दि २३ रोजी केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे कायम प्रेरणेचे स्तोत्र असलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती कोंबडी बाजार एकलव्य भिल्ल वस्ती जळगाव या ठिकाणी राहणाऱ्या बालकांच्या समवेत साजरा करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात नेताजी हे महत्वाच्या नावांपैकी एक. ” तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा ” आणि ‘जय हिंद’ चा नारा देणाऱ्या सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद फौज स्थापन केली. नेताजींचे विचार आजही युवकांना प्रेरणा देतात. नेताजींच्या जयंती निमित्त हे विचार बाळ गोपाळ यांच्या पर्यंत पोहचावे व नेताजींना अभिवादन व्हावे , या हेतूने या बालकांच्या समवेत “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा”जय हिंद च्या जय घोषात सुभाष बाबू नेताजींना अभिवादन करण्यात आले.
यावेळी जमलेल्या बालकांना खाऊ वाटप करून समतोल प्रकल्पाची माहिती देत शिक्षणाचे महत्व सांगत कार्यक्रम संपन्न केला. समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री प्रदिप पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले. विश्वजीत सपकाळे, दीपक पाचपांडे, प्रशांत चौधरी, रविना भगत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
