जळगाव ( वास्तव पोस्ट ) : रोटरॅक्ट क्लब ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च (IMR) रोटरी क्लब जळगावच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त “युवा संसद” कार्यक्रमाचे आयोजन रोटरी हॉल मध्ये केले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे रोटरी ३०३० चे २०२६-२७ साठीचे गव्हर्नर इलेक्ट (DGND) किशोर राठी, नागपूर उपस्थित होते. रोटरीचे माजी गव्हर्नर डाॅ.सिकची, रो प्रेसिडेंट सागर चित्रे, सचिव पराग अग्रवाल, माजी अध्यक्ष रो प्रेम कोगटा सह रोटरीचे बहुतांश माजी अध्यक्ष, प्रोजेक्ट समन्वयक डॉ शमा सुबोध, असिस्टंट गव्हर्नर जितेंद्र ढाके रोटरॅक्ट प्रेसिडेन्ट डॉ धनश्री चौधरी, रोटरॅक्ट माजी अध्यक्ष डॉ दिपाली पाटिल आणि जयवर्धन नेवे हे उपस्थित होते.
या उपक्रमाचा उद्देश फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर सर्व नागरीकांना संसदीय कार्यपद्धतींची विषयी माहितीचे आदानप्रदान करणे, त्यासाठी पुरक ठरणारे तरुण नेतृत्व पुढे आणणे हा होताच पण त्याच बरोबरीने युवा पिढीमध्ये पब्लिक स्पिकींगची सवय सकारात्मक पध्दतीने वाढवणे हा सुद्धा होता. या पार्लमेंटमधील सहभागी सर्व विविध विषयांवरील वादविवाद आणि चर्चां सर्व संसदिय पध्दतीने विद्यार्थीनी सादर केले. ह्या माॅक संसदेने या कारेक्रमातून उपस्थितांसमोर प्रतिसंसद उभी केली. ज्यात विवीध संसदिय प्रक्रिया आणि लोकशाही संस्थांच्या कार्यपद्धतीबद्दल एक दृष्टिक्षेप टाकला आणि संसदेत काय होणे अपेक्षित आहे आणि काय टाळणे गरजेचे आहे यावर या तरूण संसदेने आईस ब्रेकींग थाटात सादरीकरण केले.
नागरी जागरूकता वाढवण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी अशा घटना नेहमीच महत्त्वपूर्ण ठरतात. आय एम आर रोटरॅक्ट क्लबचा लिडरशीप आणि ग्रृप पार्टीशीपेशनला प्रोत्साहन देणारे असे कार्यक्रम आयोजित करण्यात नेहमीच पुढाकार असतो. या कार्यक्रमाला आय एम आर चे डायरेक्टर प्रा.डॉ.बी.व्ही. पवार यांचे विशेष मार्गदर्शन लाभले तर डॉ.शिल्पा बेंडाळे आणि किरण बेंडाळे यांचे विशेष सहकार्य लाभले.
सौरभ माळी, अथर्व वरुडकर, कल्पेश महाजन, भूमिका पाटील, निधी चौहारी, कल्याणी सुतार, मयूर बडगुजर, गायत्री भोईटे, प्रतिक साळी, आदिती पाटील, पुनम महाले, इच्छा रघुवंशी, रुख्मिना झ्याटे, मुस्कान आहुजा, कुमकुम जोशी, ऋषी बोराळे रोहन बोराळे मोनिष नाईक ओम गुरव प्रेम पाटील रुषिकेश देशमुख श्रद्धा पोपली ज्ञानेश्वर पाटील तन्वी वाघ श्रेणिक खिवसरा, तन्मय अटवाल, रुषिकेश चौधरी, विश्वेश वंजारी, मोहित सुर्यवंशी, प्रथमेश बारी वैभव निकुंभ, अबरार शेख, भावेश शिंपी, ओम पाटील, स्वप्नील मराठे, प्रथमेश मराठे आणि हेमंत फुलमाळी हे विद्यार्थी उपक्रमात सहभागी होते.
