Home » महाराष्ट्र » पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्रीवर आढावा बैठक

पुढील १०० दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने सह्याद्रीवर आढावा बैठक

मुंबई ( वास्तव पोस्ट ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे येणाऱ्या १०० दिवसांत करावयाच्या कामाच्या अनुषंगाने आढावा घेतला. यामध्ये त्यांनी परिवहन, सांस्कृतिक कार्य, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण आणि वस्त्रोद्योग विभागांना उपयुक्त सूचना दिल्या.

यावेळी थेट लाभ हस्तांतरण (DBT) योजनेंतर्गत संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या थेट खात्यात वर्ग करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करणे, शासकीय वसतीगृहाची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा वेळेवर पुरविणे आणि जात पडताळणी प्रक्रिया सुलभ व गतिमान करण्यासाठी ऑनलाईन यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री यांनी दिले.

■ परिवहन विभाग
•⁠ ⁠जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग व नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण राबविणे
•⁠ ⁠रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता (AI) चा वापर करणे.
•⁠ ⁠घाट रस्त्यांसाठी विशेष अभियांत्रिकी उपाययोजन्यात यावे
•⁠ ⁠परिवहन सेवेला गती देण्यासाठी बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सेवा सुरू करणे.

■ सांस्कृतिक कार्य विभाग
•⁠ ⁠चित्रीकरणासाठी ऑनलाईन ‘एक खिडकी’ परवानगी देण्यात यावी
•⁠ ⁠पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जन्मवर्षानिमित्त व्यावसायिक चित्रपट निर्मिती करणे.
•⁠ ⁠‘हर घर संविधान’ मोहिमेदवारे प्रत्येक घरात संविधान पोहोचविणे.

■ ग्रामविकास व पंचायतराज विभाग
•⁠ ⁠१३ लाख घरकुलांसाठी ४५० कोटींचा पहिला हप्ता लवकरच वितरित करणे.
•⁠ ⁠ग्रामीण रस्ते दर्जेदार सिमेंट काँक्रीटचे करणे.
•⁠ ⁠महाआवास अभियानाअंतर्गत प्रत्येक घर हे सौर ऊर्जेवर करणे.

■ अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
•⁠ ⁠स्थलांतरित मजुरांसाठी स्मार्ट रेशनकार्ड करणे
•⁠ ⁠ई-केवायसी प्रमाणीकरण करणे.
•⁠ ⁠‘एक गाव एक गोदाम’‍ आणि ‘एक देश, एक शिधापत्रिका’ धोरण राबविणे

■ सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग
•⁠ ⁠महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळाची स्थापना करणे
•⁠ ⁠स्थानिक वस्त्रोद्योगासाठी कॅप्टिव्ह मार्केट योजना प्रभावीपणे लागू करणे
•⁠ ⁠हातमाग विणकरांना निवृत्ती वेतन योजनेद्वारे सामाजिक सुरक्षा कवच प्रदान करणे.

या बैठकीस आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, सहकार राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव संजय खंदारे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ.श्रीकर परदेशी, सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!