Headlines
Home » जळगाव » वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण शुल्का विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन

वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण शुल्का विरोधात जिल्हाधिकारी यांना निवेदन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्य परिवहन आयुक्त कार्यालयाकडून परिवहन संवर्गातील वाहनांसह रिक्षा या हलक्या प्रवासी वाहनांना देखील योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी प्रती दिवस ५० रुपये विलंब शुल्क लावण्यात आले आहे. हे विलंब शुल्क त्वरित रद्द करण्यात यावे अशा मागणीचे एक निवेदन जिल्हाधिकारी जळगाव यांना देण्यात आले.

वाहतूकदारांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे वाहतूकदार हे दंड भरू शकत नाहीत, वाहतूकदारांच्या मागण्या मान्य करुन न्याय द्यावा. अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष इरफान शेख यांनी मांडल्या आहेत. शासनाकडून लावण्यात आलेले हे शुल्क ८ ते १० दिवसात रद्द न झाल्यास सर्व वाहतूकदारांकडून येणाऱ्या काळात महाराष्ट्रातुन मोठे जनआक्रोश व आंदोलन करण्यात येईल, असेही जिल्हा शासन व प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे .

यावेळी किरण मुरलीधर दाभाडे (शहर अध्यक्ष) शेख नबी शेख करीम (शहर संपर्क प्रमुख) संजय शिंदे(शहरसंघटक)-सचिन सुरवाडे (शहर सचिव) जब्बार भाई (संचालक जय महाराष्ट्र मोटर ड्रायव्हिंग स्कूल जळगांव) आसिफ अली खान रशीद खान (जळगाव शहर कार्यकारिणी सदस्य) कैलास प्रजा (ऑटो चालक) फरीद सुभेदार (ऑटो चालक) इमरान इब्राहिम शेख (टॅक्सी चालक) हेमंत प्रल्हाद सोनवणे (मालवाहू टेम्पो चालक) प्रभाकर पाटील (ऑटो चालक) सतीश पंढरीनाथ बारी (ट्रक चालक मालक) तान्हाजी देवरे (ऑटोचालक) पुरुषोत्तम गणपत सोनार (ऑटो चालक) श्याम चौधरी ऑटो चालक) संभाजी पितांबर देवरे ऑटो चालक /चालक-मालक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!