Home » जळगाव » हतनुर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळासमोर सामाजिक न्यायार्थ आमरण उपोषण !

हतनुर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळासमोर सामाजिक न्यायार्थ आमरण उपोषण !

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगाव पाटबंधारे विभाग अंतर्गत हतनूर धरणापासून यावल रावेर तसेच चोपडा तालुक्यात गेलेले हतनूर वर पाट फुटी बाबत व इतर काही कारणास्तव चौकशी व कार्यवाही होण्यासाठी केलेल्या तक्रार अर्जा च्या मुद्द्यांसंबंधी समाधान न झाल्याने नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते नितिन रंधे हे सोमवार दि.१७ रोजी तापी पाटबंधारे महामंडळ जळगाव येथील कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार आहेत.

या उपोषणा संदर्भात लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण जळगाव अधीक्षक अभियंता यांच्याकडे दि.११ फेब्रुवारी २०२५ रोजी निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नितिन रंधे यांनी नमूद केले आहे की, जळगाव पाटबंधारे विभाग यांच्या अंतर्गत हतनुर उजवा कालवा किलोमीटर १४.१५ सुर जलसेतू आणि मानमाळी जलसेतू जवळ हंगाम २०२४-२५ मध्ये कालवा फुटण्याची घटना घडली होती. या कालवा फूटी मुळे चालू रब्बी हंगामात शेतकरी पाण्यापासून वंचित राहीले असून दरवर्षी कोट्टयावधी रुपये खर्च करून देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येत आहे. प्रत्यक्षात मात्र कामे होत नसल्याचे दिसून येते.

गेल्या तीन वर्षापासून याविषयी तक्रारी करूनही तपासणी अहवाल मिळाला नाही. तसेच संबंधित कार्यालयाकडून तक्रार अर्जाची चौकशी न करताच अर्ज निकाली काढण्यात आला. अधीक्षक अभियंता दक्षता पथक ठाणे यांच्या कडून तक्रार अर्ज निकाली काढण्यात आल्याचे कळविण्यात आले. तरी संबंधित विभाग आणि दक्षता पथक यांचे संगनमताने प्रकरण दाबण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे. माझी बनावट स्वाक्षरी करून हा अर्ज निघाली काढला असून या स्वाक्षरी बाबत संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे कोणताही साक्षीदार किंवा पुरावा नाही, ही स्वाक्षरी संशयास्पद असून बनावट स्वाक्षरी करून वरिष्ठ कार्यालयाची दिशाभूल केली आहे.

सोमवार पासून उपोषणकर्ता आमारण उपोषणास बसत असल्याने आता याबाबत वरिष्ठ पातळीवरून काय कार्यवाही होणार याबाबत जळगाव जिल्हावासीयांचे लक्ष वेधले जाणार आहे.

  गेल्या तीन वर्षापासून मी जळगाव हतनूर कालवा फुटी बाबत तापी पाटबंधारे महामंडळ कार्यालयाकडे तक्रार करून पाठपुरावा करत आहे. मात्र सदर कार्यालयाच्या चुकीच्या कामासंबंधी मी उपोषण करणार असून मला न्याय मिळावा...
उपोषणकर्ते… नितीन रंधे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!