जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महायुती सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार यांचे नेतृत्वाखाील करण्यात आले. यावेळी महायुती सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला चिखल मारून निषेध करण्यात आला.
या प्रसंगी आमदार शिरीषदादा चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष संदीप भैय्या पाटील, माजी जि.प.सदस्य प्रभाकर आप्पा सोनवणे, माजी नगराध्यक्ष दारा मोहमद, हरीश गणवाणी, जळगांव शहराध्यक्ष श्याम तायडे, डॉ.ए.जी. भंगाळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर कोळी, जिल्हा सरचिटणीस आत्माराम जाधव, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.जगदीश पाटील, युवानेते धनंजय चौधरी, आशुतोष पवार, मुक्ताईनगर तालुकाध्यक्ष, दिनेश पाटील, व्हीजे एन.टी.अध्यक्ष सुभाष जाधव, ओबीसी अध्यक्ष डी.डी.पाटील, जामनेर तालुकाध्यक्ष शंकर राजपूत, जिल्हा उपाध्यक्ष एस.टी.पाटील, पाचोरा सचिन सोमवंशी, भडगांव तालुकाध्यक्ष रतीलाल महाजन, सेवादल अध्यक्ष संजय पाटील, बोडवड दिलीप पाटील, पिंटू पाटील, चोपडा अध्यक्ष नंदकिशोर संगोरे, जळगाव तालुकाध्यक्ष मनोज चौधरी, धरणगाव तालुकाध्यक्ष व्ही.डी.पाटील, शहराध्यक्ष अनंत परीहार, रावेर तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र पाटील, अमळनेर गोकुळ बोरसे, वाशिम काझी, देवीदास ठाकरे, मीराताई सोनवणे, युवराज खडके, दीपक सोनवणे, जलील पटेल, डॉ.ऐश्वरी राठोड, यांचेसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
