Headlines
Home » शैक्षणिक » प्रा. राजेंद्र चिंचोले ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

प्रा. राजेंद्र चिंचोले ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त

पाचोरा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले हे नुकतेच आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले.

त्यांच्या पिंपळगाव हरेश्वर येथील महाविद्यालयात आयोजित सेवापूर्ती सोहळ्याप्रसंगी शिवसेना नेत्या वैशालीताई सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून निरोपप्रसंगी भेटवस्तू देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सेवेत समावेश झाला तो पहिला दिवस व सेवा निवृत्तीचा दिवस माणसाच्या हे नेहमीच लक्षात राहतो. ही निवृत्ती नसून एक नवीन आवृत्ती देखील असू शकते. येणाऱ्या काळात चिंचोले सर समाजात एक मार्गदर्शक म्हणून दिशादर्शक म्हणून काम करतील असा विश्वास वैशालीताई सुर्यवंशी यांनी आपले मनोगत मांडताना व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!