Headlines
Home » सामाजिक » प्रा.डाॅ. सत्यजित साळवे यांना ‘मिलिंद सन्मान’ पुरस्काराने गौरविले

प्रा.डाॅ. सत्यजित साळवे यांना ‘मिलिंद सन्मान’ पुरस्काराने गौरविले

जळगाव | दि.२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाचे माजी संचालक तसेच जळगाव येथील डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. सत्यजित साळवे यांना त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याबद्दल नागसेन फेस्टिवल, छत्रपती संभाजी नगरचा ‘मिलिंद सन्मान’ पुरस्कार मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. तायडे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर येथील आजी-माजी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी छत्रपती संभाजी नगर येथे नागसेन फेस्टिवलचे आयोजन केले जाते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!