Headlines
Home » महाराष्ट्र » मुंबई महानगराच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी “थ्री डी मॅपिंग” करण्याची कार्यवाही सुरू

मुंबई महानगराच्या अत्याधुनिक नागरी व्यवस्थापनासाठी “थ्री डी मॅपिंग” करण्याची कार्यवाही सुरू

मुंबई | दि. १५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पूर्व उपनगरे, आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज वांद्रे कुर्ला संकुल येथे थ्री डी मॅपिंगचा शुभारंभ करण्यात आला. जिओस्पेशिअल तंत्रज्ञानाचा वापर करून हे त्रिमितीय अर्थात थ्री डी मॅपिंग (डिजीटल ट्वीन) केले जाणार आहे. त्यामध्ये मुंबईतील महानगरपालिकेच्या सर्व प्रशासकीय विभागांचे मिळून ५०० चौरस किलोमीटर क्षेत्र समाविष्ट असेल.

या माध्यमातून मुंबई महानगराचे अतिशय अचूक आणि हुबेहूब डिजीटल प्रतिरुप विकसित करण्यात येईल. त्यासाठी अद्ययावत, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि त्याच्या जोडीला कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची देखील मदत घेण्यात येणार आहे.

याद्वारे अचूक नागरी नियोजन करता येईल. यामध्ये पायाभूत सुविधा विकास, आपत्ती व्यवस्थापन, अतिक्रमण निर्मूलन व प्रतिबंध यासारख्या बाबी सोप्या होतील, अशी माहिती संचालक माहिती तंत्रज्ञान शरद उघडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!