Headlines
Home » राष्ट्रीय » सरदार पटेल जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून पुष्पांजली अर्पण

सरदार पटेल जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेकडून पुष्पांजली अर्पण

अहमदाबाद ( वास्तव पोस्ट ) : पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त स्टॅच्यू ऑफ़ यूनिटी येथे त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आज दि.३१ ऑक्टोबर रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची १४९ वी जयंती आहे. या निमित्ताने केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे एकता परेडचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. त्यांनी सरदार पटेल यांना पुष्पांजली अर्पण केली. पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी सव्वा सात वाजता त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पोहोचून पुष्पहार अर्पण केला. एकता दिनानिमित्त मोदींनी त्यांना शपथ दिली. ते म्हणाले- मी शपथ घेतो की मी देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षेसाठी स्वत:ला समर्पित करीन आणि हा संदेश माझ्या देशवासियांमध्ये पोहोचवण्याचा माझा प्रयत्नही करेन. शपथविधीनंतर युनिटी डे परेड झाली. यात ९ राज्ये आणि १ केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांच्या १६ मार्चिंग तुकड्या, ४ केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, NCC आणि मार्चिंग बँड यांचा समावेश होता.

युनिटी डे परेडमध्ये एनएसजीची हेल ​​मार्च तुकडी, बीएसएफ आणि सीआरपीएफच्या पुरुष आणि महिला बाइकर्सची रॅली, बीएसएफचा मार्शल आर्ट शो, शाळकरी मुलांचा पाइप बँड शो, वायुसेनेचा ‘सूर्य किरण’ फ्लायपास्टचा समावेश होता. पीएम मोदी बुधवारीच गुजरातमध्ये पोहोचले होते. त्यांनी एकता नगरमध्ये २८० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!