Headlines
Home » महाराष्ट्र » महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर ; बहुचर्चित गृहखातं अखेर मुख्यमंत्र्यांकडेच, तर अर्थ खाते अजित पवारांकडे

महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर ; बहुचर्चित गृहखातं अखेर मुख्यमंत्र्यांकडेच, तर अर्थ खाते अजित पवारांकडे

Maharashtra Cabinet Portfolio : अखेर महायुती सरकारचा खातेवाटपाचा तिढा सुटला असून ३९ मत्र्यांमध्ये खातेवाटप जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह खातं स्वतःकडेच ठेवले आहे, तर अजित पवार यांच्याकडे अर्थखात्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

नागपूर ( वास्तव पोस्ट ) : विधानसभा निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत राज्याची सत्ता राखली. मात्र निकालानंतर दोन आठवड्याने देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर नागपुरात ३९ मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन शनिवारी संपले आहे. मात्र मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या ३९ मंत्र्यांना कोणत्या खात्याची जबाबदारी देण्यात आली नव्हती. अखेर ७ दिवसानंतर खातेवाटप जाहीर झाले आहे.

अपेक्षेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते हे आपल्याकडेच ठेवले आहे. तर महसूल खात्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण खाते तर अजित पवारांकडे अर्थ व राज्य उत्पादन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान पार पडले व २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला. मात्र सुरुवातील मुख्यमंत्रीपदावरून घोळ झाल्याने दोन आठवड्यांनंतर म्हणजे दि.५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर १० दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दि.१५ डिसेंबर २०२४ रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला.

मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या सात दिवसानंतर आता मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आले असून भाजपने गृह, महसूल, जलसंधारण, उच्च व तंत्र शिक्षण, कौशल्य विकास, सांस्कृतिक, वन, राजशिष्टाचार, पर्यावरण, माहिती तंत्रज्ञान आदि मंत्रालये आपल्याकडे ठेवली आहेत. महायुतीतील घटक पक्षांमध्ये मंत्रिपदावरून वाद सुरू होता. भाजप आणि शिवसेनेने एकाचवेळी अर्थ, गृह आणि नगरविकास मंत्रालयावर दावा केला होता. अजित पवार यांनी देखील नगरविकास मंत्रालयावर दावा केला होता. परंतु आता गृहमंत्रीपद भाजपकडे, नगरविकास आणि गृहनिर्माण खाते एकनाथ शिंदेंकडे तर अर्थखाते अजित पवारांकडे देण्य़ात आले आहे.

महायुतीमधील खातेवाटप पुढीलप्रमाणे :
१. देवेंद्र फडणवीस : मुख्यमंत्री,गृह,ऊर्जा,न्याय व विधी,सामान्य प्रशासन,माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेली अन्य खाती
२. एकनाथ शिंदे : उपमुख्यमंत्री, ग्रामविकास, नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग
३. अजित पवार : उपमुख्यमंत्री, अर्थ व नियोजन,राज्य उत्पादन शुल्क

कॅबिनेट मंत्री :
१. चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
२. राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास )
३. हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
४. चंद्रकांत पाटील : उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
५. गिरीश महाजन : जलसंधारण ( विदर्भ, तापी, कोकण विकास ), आपत्ती व्यवस्थापन
६. गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
७. गणेश नाईक : वन
८. दादाजी भुसे : शालेय शिक्षण
९. संजय राठोड : माती व पाणी परीक्षण
१०. धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
११. मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
१२. उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा
१३. जयकुमार रावल : विपणन, प्रोटोकॉल
१४. पंकजा मुंडे : पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
१५. अतुल सावे : ओबीसी विकास,दुग्धविकास मंत्रालय,ऊर्जा नुतनीकर
१६. अशोक उईके : आदिवासी विकास मंत्रालय
१७. शंभूराज देसाई : पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
१८. आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
१९. दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
२०. अदिती तटकरे : महिला व बालविकास
२१. शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
२२. माणिकराव कोकाटे : कृषी
२३. जयकुमार गोरे : ग्रामविकास, पंचायत राज
२४. नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन
२५. संजय सावकारे : कापड
२६. संजय शिरसाट : सामाजिक न्याय
२७. प्रताप सरनाईक : वाहतूक
२८. भरत गोगावले : रोजगार हमी,फलोत्पादन
२९. मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
३०. नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे
३१. आकाश फुंडकर : कामगार
३२. बाबासाहेब पाटील : सहकार
३३. प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )
३४. माधुरी मिसाळ : सामाजिक न्याय,अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय,वैद्यकीय शिक्षण
३५. आशिष जयस्वाल : अर्थ आणि नियोजन,विधी व न्याय
३६. मेघना बोर्डीकर : सार्वजनिक आरोग्य,कुटुंब कल्याण,पाणी पुरवठा
३७. इंद्रनील नाईक : उच्च आणि तंत्र शिक्षण,आदिवासी विकास आणि पर्यटन
३८. योगेश कदम : गृहराज्य शहर
३९. पंकज भोयर : गृहनिर्माण.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!