Home » जळगाव » मूळजी जेठा महाविद्यालयात ११ रोजी ‘मेघ दाटूनी येता…’ पावसांच्या कवितांचे काव्यवाचन

मूळजी जेठा महाविद्यालयात ११ रोजी ‘मेघ दाटूनी येता…’ पावसांच्या कवितांचे काव्यवाचन

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आणि कान्ह ललित कला केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने ११ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मूळजी जेठा स्वायत्त महाविद्यालयाच्या जुना कॉन्फरन्स हॉल येथे ‘मेघ दाटूनी येता…’ चिंब पावसाच्या कवितांच्या काव्य वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मराठी साहित्यातील महत्वाच्या कवींच्या कवितांचे गायन व अभिवाचन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. सं.ना.भारंबे, के.सी.ई. सोसायटीच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक शशिकांत वडोदकर, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी ठाकरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे लेखन व निवेदन गणेश सूर्यवंशी, अभिवाचन डॉ. श्रद्धा पाटील व गायन प्रा. ईशा वडोदकर या करणार आहेत. काव्य रसिकांना उपस्थितीचे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!