एरंडोल येथे मतदार जनजागृती सायकल रॅलीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहभागी
जळगाव | दि.३१ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृतीचे विविध माध्यमातून कार्यक्रम सुरु आहेत. आज एरंडोल येथे सकाळी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सायकल घेऊन रॅलीत सहभागी झाले. त्यामुळे इतरांमध्ये उत्साह निर्माण झाला. एरंडोल तहसील कार्यालयापासून रॅलीला सुरुवात…
