Headlines
Home » जळगाव » खडका येथील रहीवासी सुमनबाई अडकमोल यांचे दुःखद निधन

खडका येथील रहीवासी सुमनबाई अडकमोल यांचे दुःखद निधन

जळगाव | दि.२८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव जिल्ह्यातील खडका ता. भुसावळ येथील रहीवासी नितिन चावदस अडकमोल (महार रेजिमेंट बटालियन लांस नायक, सेवा निवृत्त) यांच्या आई तसेच जळगाव येथील बी. एस. रंधे (सेवानिवृत ग्रेड. मुख्याध्यापक) यांच्या भगिनी सुमनबाई चावदस अडकमोल यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. उपचारासाठी त्यांना जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

दरम्यान उपचार सुरु असतांनाच आज दि.२८ मार्च रोजी दुपारी ३:०० वाजता त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांची अंत्ययात्रा दि.२९ मार्च रोजी सकाळी ८:०० वाजता खडका येथे रहात्या घरुन निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, व नातवंडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!