जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात मतदानामुळे ११ ते १३ मे पर्यंत मद्यविक्री बंद
जळगाव | दि. १० ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघात १३ मे २०२४ रोजी मतदान होणार आहे. निवडणूक प्रक्रिया खुल्या, भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात मतदान कालावधी संपण्याच्या ४८ तास अगोदरपासून ते मतदान संपेपर्यंत जिल्ह्यातील मद्यविक्री पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी…
