Headlines
Home » राजकीय » पाचोरा तालुक्यात दुमदुमला परिवर्तनाचा नारा; करण पाटील यांचे उत्स्फुर्त स्वागत

पाचोरा तालुक्यात दुमदुमला परिवर्तनाचा नारा; करण पाटील यांचे उत्स्फुर्त स्वागत

पाचोरा | दि.३० (वास्तव पोस्ट न्यूज) – जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांनी आज पाचोरा तालुक्यातल्या ग्रामीण भागात दौरा केला असून याला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फुर्तपणे स्वागत करण्यात आले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी सांभाळली असून त्यांच्या सोबतील तिन्ही पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी कार्यरत आहे. आधी स्वत: ताईंनी पाचोरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचार फेरी काढली होती. यानंतर आता स्वत: उमेदवार करण पाटील यांनी काल भडगाव शहरासह ग्रामीण भागात प्रचार फेर्‍या काढल्या. यानंतर आज पाचोरा तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदारांशी संवाद साधण्यात आला.

आज सकाळच्या सत्रात माहीजी माता मंदिरात दर्शन घेऊन प्रचार फेर्‍यांना प्रारंभ करण्यात आला. यानंतर माहिजीसह कुरंगी, नांद्रा, बांबरूड राणीचे, लासगाव, सामनेर, वरखेडी, भोकरी, आंबेवडगाव आणि पिंपळगाव हरेश्‍वर येथील नागरिकांच्या घरोघरी जाऊन परिवर्तनासाठी कौल मागण्यात आला. समग्र विकासासाठी आपल्याला कौल देण्याचे आवाहन करण पवार यांनी केले. प्रचाराच्या दरम्यान ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

आजच्या प्रचार फेरीत शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस, आम आदमी पक्ष आणि मित्रपक्षांच्या आघाडीतील विविध नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!