Headlines
Home » जळगाव » पी.जी. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त साडी डे साजरा

पी.जी. महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त साडी डे साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : के. सी. ई च्या पी.जी. महाविद्यालयाच्या ‘रिदम2025’ स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने साडी डे साजरा करण्यात आला. सकाळपासून महाविद्यालयातील परिसर हा विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भरला होता. विद्यार्थिनींनी विविध पारंपरिक, पैठणी, नऊवारी, सहावारी साड्यांचा पेहराव करून लक्ष वेधले. तसेच विविध क्स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. दि.१५ बुधवार रोजी सकाळी १० वाजता स्नेहसंमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

यावेळी प्राचार्य प्रा.के. बी. महाजन, डॉ. व्ही.एस. झोपे, महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. संदीप पाटील व स्नेहसंमेलन समन्वयक प्रा. आर.एम पाटील उपस्थित राहतील. दिवसभरात विद्यार्थ्यांकडून विविध नृत्य, नाट्य, गायन स्पर्धा इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!