Home » महाराष्ट्र » अन्यथा मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार

अन्यथा मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही ; उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही ज्या उमेदवाराला उभा करू त्याला तुम्ही खासदार केलं पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लोकसभेला आमच्या उमेदवाराला निवडून दिलं तरच मी विधानसभा निवडणुकीला उभा राहीन, अन्यथा मी निवडणूक लढवणार नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. अजित पवार बारामतीकरांना म्हणाले, तुम्ही साथ देणार नसाल तर मला माझा प्रपंच पडला आहे. बारामती येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बोलताना अजित पवार यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना आणि मतदारांना बारामती लोकसभा निवडणुकीत त्यांच्या गटातील उमेदवाराला जिंकवण्याचं आवाहन केलं. तुम्हाला काही लोक भावनिक करतील. आता तुम्हाला विकास हवा आहे की भावनिक व्हायचं आहे ते तुम्हीच ठरवा.

दरम्यान लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुका लक्षात घेता महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुण्यासह महाराष्ट्रभर मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी सकाळी बारामतीतल्या विकासकामांची पाहणी केली. तसेच त्यांच्या गटातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित केलं. तेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना , आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहा, जोमाने प्रचार करायला सांगितले .

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!