जळगाव ( वास्तव पोस्ट ) : डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालयात आज दि.१९ रोजी प्रथम वर्ष एल.एल.बी. व प्रथम वर्ष बी.ए. एल.एल.बी. या विद्यार्थ्यांसाठी “Fresher’s Party व Induction Programme” चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ ॲडवोकेट जी.एम. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी जी.एम.पाटील यांनी विद्यार्थ्यांना कायदेविषयक सखोल माहिती, वकिली व्यवसायातील बारकावे तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नयना महाजन (झोपे) या होत्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा भिडे ( S.Y. B.A. LLB ) व सनी कौर (S.Y. LLB) यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
