Headlines
Home » सामाजिक » महात्मा फुले जयंतीप्रसंगी, “शिक्षण हेच परिवर्तन घडवून आणण्याचे शस्त्र आणि शास्त्र” :आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

महात्मा फुले जयंतीप्रसंगी, “शिक्षण हेच परिवर्तन घडवून आणण्याचे शस्त्र आणि शास्त्र” :आरपीआय जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांचे प्रतिपादन

जळगाव | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा भव्य जयंती सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आरपीआय आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी उपस्थित होते. महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. प्रताप गुलाबराव पाटील जिल्हा परिषद सदस्य, पवन सोनवणे, डॉ.मिलिंद बागुल प्रा. डॉ. सत्यजित साळवे, सरपंच गोविंदा पवार, जळगाव पंचायत समितीचे माजी सभापती बापू कृष्णा पवार मिलिंद सोनवणे जळगाव प्रा. राजू पाटील, बापू धनगर, शितल‌ चिंचोरे, समाधान चिंचोरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष राजूभाऊ सूर्यवंशी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून जमलेल्या समाज बांधवांना शिक्षणाच्या मार्गाने जाण्याचा महत्त्वाचा उपदेश केला. शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, शिक्षणानेच माणसाच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडून येतात.

महिलांची शक्ती प्रज्वलित करण्यामध्ये ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा महत्त्वाचा वाटा आहे. पहिली मुलींची शाळा भारतामध्ये सुरू करून एक ऐतिहासिक कार्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. सर्व समाजाला संघटित करून जे जे वाईट आहे ते-ते नष्ट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी देखील शिक्षण समाजाच्या उत्थानासाठी अत्यंत आवश्यक आहे. शिकलेला समाज हा खऱ्या अर्थाने बदल घडवून आणतो आणि बदल घडवून आणण्याची ताकद फक्त आणि फक्त शिक्षणात आहे, असे महत्त्वाचे विचार मांडले.

प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी समाजामध्ये शिक्षणाबद्दलची वाढलेली अनास्था आणि व्यसनाधीनता यांच्यावर प्रकाश टाकला माता बंधू-भगिनींनी आपल्या मुलाबाळांच्या शिक्षणाकडे अतिशय काळजीने लक्ष दिलं पाहिजे. मुले शाळेत जातात किंवा नाही याच्या संदर्भात नेहमी शाळेतील शिक्षकांची विचारपूस केली पाहिजे. शिक्षण हे आमच्या क्रांतीचे महत्त्वाचे साधन आहे. शिक्षण घेतल्यानंतर व्यसनांपासून दूर राहणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. व्यसनामुळे आपले शरीराची संपत्ती नष्ट होते. ती महत्त्वाची संपत्ती आहे. ज्ञान आणि काया या दोन्हीच्या बळावर आपण उत्तुंग भरारी घेतो. त्यासाठी या दोघांची काळजी घेणे संवर्धन करणे, जतन करणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला त्यांनी आपल्या मनोगतातून दिला.

डॉ. मिलिंद बागुल यांनी देखील महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला उजाळा दिला त्याचबरोबर पंचायत समितीचे माजी सभापती बापू कृष्णा पवार यांनी देखील गावाच्या एका सांस्कृतिक वाटचालीचा आणि वारसाचा मागवा घेतला. जि प सदस्य प्रताप भाऊ पाटील यांनी देखील आपल्या मनोगतातून वंचित दुर्लक्षित घटकांसाठी आपण करीत असलेल्या विकास कामांच्या आधारे एक नवा समाज निर्मिती च्या दिशेने आपण पाऊल टाकतो आहोत असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमात आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल म्हसावद गावाचे सरपंच गोविंदा पवार आणि नागसेन फेस्टिवल औरंगाबादचा मिलिंद सन्मान मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. सत्यजित साळवे या दोघांचाही भव्य नागरी सत्कार करण्यात आला. नवोदय विद्यालय‌ येथे निवड झाल्याबद्दल बालिका पवार चा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय पवार यांनी मानले.

कार्यक्रमाला बापूराव पानपाटील विजयकुमार अमित सोनवणे, महेंद्र शिंदे, राजू शिरसाट, प्रवीण शिंदे, अजय गायकवाड, नितीन वानखेडे, संदीप उत्तम सोनवणे, विकास जाधव, संदीप सोनवणे, सागर खेडकर, सागर शिरसाळे, अक्षय केदार, अमोल बिऱ्हाडे, सोनू रंधे, राज केदार, अविनाश शिरसाळे, कार्तिक जाधव, राज सूर्यवंशी, प्रशांत केदार, रोहित अहिरे, युवराज सपकाळे, अनिल बंडू सोनवणे, रितेश तायडे, बंटी जाधव, आर्यन दांडगे, कल्पेश मुजुमदार, सुमित सूर्यवंशी, शैलेश सोनवणे, रघुनाथ सोनवणे, भूषण मोरे, समाधान बिऱ्हाडे, पवन सकट, अविनाश केदार, समाधान इंगळे, नितेश वाकडे, अरुण पवार, विजय रंधे, सुधाकर सपकाळे, सुधाकर मेढे, डॉ. सुधाकर पाटील तसेच गावातील महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रम संपल्यानंतर भव्य अन्नदानाचा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!