Home » महाराष्ट्र » निशांत रंधे यांचा शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल ; ‘टीडीफ’ मध्ये फुट !

निशांत रंधे यांचा शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल ; ‘टीडीफ’ मध्ये फुट !

नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक : TDF चे राज्य कार्यकारणीचे सदस्य असलेले निशांत रंधे गेल्या वर्षभरात पाचही जिल्ह्यांतील संस्थाचालक, शिक्षकांच्या संपर्कात आहेत. निशांत रंधे राज्यातील शिक्षकांची संघटना असलेल्या शिक्षक लोकशाही दल व टीडीएफचे गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय सदस्य आहेत.

नाशिक ( वास्तव पोस्ट न्यूज ) : लोकसभा २०२४ सार्वत्रिक निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत अनेक इच्छुकांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु या निवडणुकीत आता एक मोठा ट्वीस्ट आला असून शिक्षकांची सर्वात मोठी संघटना टीडीएफ मध्ये फूट पडल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्या पाठोपाठ आता टीडीएफ संघटनेचे राज्य कार्यकारणीचे सदस्य निशांत रंधे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या सर्वात मोठ्या संघटनेत निशांत रंधे यांच्यामुळे फूट पडल्याचे दिसून येत आहे.

टीडीएफ संघटनेकडून उमेदवारी मिळावी अशी निशांत रंधे यांनी मागणी केली होती. मात्र निशांत रंधे यांना उमेदवारी नाकारल्याने आता ते भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. धनशक्तीला उत्तर देण्यासाठी उमेदवारी करत असल्यास देखील निशांत रंधे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता शिक्षक निवडणुकीत शिक्षकांच्या सर्वात मोठ्या टीडीएफ संघटनेत फूट पडल्याने ही निवडणूक चर्चेत आली आहे.

दरम्यान, राजेंद्र विखे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मला शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावायचे आहेत. राजकारण विरहित शिक्षकांच्या प्रश्नांवर काम करायचे आहे. विनाअनुदानित प्राध्यापकांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना अनुदानित करायचे आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या दरबारी प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न असेल त्यांनी मी आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!