जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : मानव सेवा माध्यमिक विद्यालय जळगाव येथे दि.२२ जुलै २०२४ सोमवार रोजी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे आयोजित माननीय शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशान्वये २२ जुलै ते २८ जुलै २०२४ शिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले.
सदर शिक्षण सप्ताह राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त साजरा करण्यात येत आहे. त्यातील आजचा दुसरा दिवस “मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस” म्हणजेच भाषा व गणितीय माहिती दिवस म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपशिक्षिका अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिता शिरसाठ व गिरीष जाधव उपस्थित होते.

या क्रार्यक्रमात इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला निपुण प्रतिज्ञा घेण्यात आली व त्यानंतर विद्यार्थ्यांना गणित तज्ञांची माहिती LCD प्रोजेक्टरवर दाखविण्यात आली. तसेच संख्याज्ञान व साक्षरता विषयाअंतर्गत विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या गणित तज्ञांची माहिती सांगितली. गणित शिक्षिका रत्ना चोपडे यांनी विद्यार्थ्यांना आर्य भट्ट व रामानुजन या गणितीय तज्ञांची माहिती सांगितली.

शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना ‘गणितातील क्लुप्त्या’ याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीष जाधव यांनी तर आभार अलका महाजन यांनी मानले.
