जळगाव ( वास्तव पोस्ट ) : भारतातील सर्वच राज्यातील सामुदायिक रेडिओ केंद्राच्या प्रतिनिधींना भारत सरकार तर्फे विशेष निमंत्रण देवून मुबंई च्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, येथे दि ३ मे २०२५ ला आयोजन करण्यात आले. जळगाव मू.जे. महाविद्यालयाच्या रेडीओ मनभावन ९०.८ एफ एम चे संचालक अमोल देशमुख हे खान्देश भागाचे प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने देशात किमान जास्तीत जास्त कम्युनिटी रेडिओ स्टेशन असावेत,असं धोरण ठरवले आहे. या धोरणानुसार महाराष्ट्रात सध्या सुमारे ५४ कम्युनिटी रेडिओ स्टेशन कार्यरत आहेत, तर देशात ५०० च्या वर सामुदायिक रेडिओ केंद्र (CRS) उभारणी झालेली आहे.यात शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, स्वयंसेवी संस्था आणि कृषी संशोधन संस्था यांना कम्युनिटी रेडिओ स्टेशन सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कम्युनिटी रेडिओ स्टेशन देशाच्या ग्रामीण आणि निमशहरी भागात असुन स्थानिक पातळीवर विविध स्तरांवरील लोकांचा सहभाग घेऊन कम्युनिटी रेडिओ अतिशय चांगले काम करीत आहेत. महाराष्ट्र राज्य सामूहिक रेडिओ संघाद्वारे राष्ट्रीय संमेलन हे राज्यात व्हावे या करिता आग्रही विनंती केली होती. तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी @ वेव्ह्ज -25 जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे आयोजित ‘वेव्ह्ज 2025’ कार्यक्रम येथे महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या वेव्ह्ज विशेषांकाचे प्रकाशन केले.
