Headlines
Home » जळगाव » युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा खडसे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

युवक आणि क्रीडा राज्यमंत्री, रक्षा खडसे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : युवक आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत असून प्रशासनाकडून या दौऱ्याबाबत दुजोरा प्राप्त झाला असून त्यांच्या या दौऱ्यातील कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत-

बुधवार दि २९ जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता मुक्ताईनगर येथे आगमन होईल,
दुपारी १२ ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठक, त्यानंतर मुक्ताईनगर येथे मंत्री रक्षा खडसे या मुक्कामी असतील.

गुरुवार दिनांक ३० जानेवारी, २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजता स्थानिकांसोबत व कार्यकर्त्यांसोबत मुक्ताईनगर येथील स्थानिक कार्यालयात बैठकीत त्या उपस्थित राहतील. तर सायंकाळी ६ वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होतील. रात्री उशिरा ९:३० वाजता छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचे आगमन होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!