Home » जळगाव » रिपब्लिकन पक्षाच्या युवा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे

रिपब्लिकन पक्षाच्या युवा पश्चिम जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे जळगाव जिल्हा पश्चिम युवा जिल्हाध्यक्षपदी मिलिंद सोनवणे यांची निवड पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशान्वये पक्षाचे राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली आहे. यावेळी पक्षाचे खानदेश विभागीय अध्यक्ष लक्ष्मण जाधव, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, भुसावळ शहर अध्यक्ष सुनील ढिवरे उपस्थित होते.

या निवडीबद्दल पश्चिम जळगाव जिल्हा अध्यक्ष आनंद खरात, युवा जिल्हा अध्यक्ष भगवान सोनवणे, यावल तालुका अध्यक्ष विष्णू पारधे, अरुण गजरे, रावेर तालुका अध्यक्ष विकी तायडे, बोदवड तालुका अध्यक्ष समाधान वाघ, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष बोदडे, अमळनेर तालुका अध्यक्ष यशवंत बैसाणे, पारोळा तालुका अध्यक्ष अशोक कापडने, एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, भडगाव तालुका अध्यक्ष अण्णा खेडकर, पाचोरा तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, जिल्हा सचिव भरत मोरे, शहराध्यक्ष पाचोरा भैयाबागवान, महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जळगाव उपाध्यक्ष यशवंत घोडेस्वार, अक्षय मेघे, किरण गव्हाणे, अविनाश पारधे, मुकेश सपकाळे, पंकज सोनवणे, प्रवीण वाघ, दिनेश सोये, गोलू सोनवणे, कुणाल भावसार यांनी अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!