जळगाव, दि.१४ ( वास्तव पोस्ट न्युज )– तालुक्यातील म्हसावद येथील स्वा. सै. पं. ध. थेपडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील आज दि.१४रोजी दिवस ‘मातृ-पितृ पूजन दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी.डी.चौधरी होते. तसेच व्यासपीठावर डॉ. गणेश चौधरी उपप्राचार्य जी.डी. बच्छाव ज्येष्ठ शिक्षक के. पी.पाटील कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री. योगराज चिंचोरे शिक्षक प्रतिनिधी सचिन चव्हाण व विद्यार्थी पालक, ग्रामपंचायत सदस्य बापू धनगर, दीपक चिंचोरे, आणि सौ. शितल चिंचोरे, गणेश आमले,किशोर पटेल, नरेंद्र महाजन, अभिलाष महाजन,वाल्मिक सोनार आणि गावातील विद्यार्थ्यांचे सर्व पालक सपत्नीक उपस्थित होते.

विद्येची देवता सरस्वती मातेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. तद्नंतर सर्व मान्यवर पालकांचे स्वागत करण्यात आले. आणि मातृ-पितृ पूजन सोहळ्याला सुरुवात झाली डॉ गणेश चौधरी यांनी मंत्रोपचाराने आई-वडिलांचे आपल्या जीवनातील महत्त्व सांगत विधिवत मातृ-पितृ पूजन करून घेतले. हे पूजन सुरू असताना विद्यार्थी आणि त्यांचे पालक अतिशय भावनिक झाले होते. विद्यालयाचे प्राचार्य पी. डी. चौधरी यांनी आपल्या भाषणातून आई-वडिलांचे जीवनातील महत्त्व विशद केले. आई-वडिलांशिवाय या जगामध्ये कोणीच श्रेष्ठ नाही त्यांची सेवा करा, कायम त्यांच्या ऋणात रहा,अशा संस्कारातून भारतातील वृध्दाश्रम ही संकल्पना नष्ट होवू शकते. असे सांगितले. तसेच विद्यार्थी पालक किशोर पटेल यांनी आपल्या मनोगतात थेपडे विद्यालयाने खूप चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमातून देशाची संस्कृती जपली जाते असे सांगितले व माता-पिता सोबत गुरुपूजन करण्यात यावे असे सुचवले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. जे. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे उपप्राचार्य जी. डी. बच्छाव यांनी केले.कार्यक्रमाची सांगता केली व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांचे अनमोल सहकार्य लाभले.
